परिसर या संस्थेच्या वतीने सोलापूर शहरात मागणी पत्र लिहिण्याचा एक उपक्रम राबविण्यात आला. सोलापूर मध्ये बस सुविधा चालू व्हाव्यात ह्या उद्देशाने रंगभवन चौक >> सात रस्ता >> ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक ते सोलापूर महानगरपालिका या दरम्यान लोकांकडून मागणी पत्र भरण्यात आली. या उपक्रमात विविध स्थरावरील लोकांची मते नोंदवली गेली. त्यात व्यापारी, रिक्षाचालक, विद्यार्थी, सोलापूर शहरात विविध ठिकाणी काम करणारा कर्मचारी वर्ग आणि फळे भाजी विकणाऱ्या लोकांपासून सर्वांनी आपली मते नोंदवली. या दरम्यान असे दिसुन आले की सोलापूर मधील नागरिक हा खाजगी वाहतुकी पासून त्रस्त आहेच परंतु आपल्या समस्या कुठे व कशा मांडता येतील ह्या सांगण्यास उत्सुकही आहे. सोलापुरची सध्याची स्थिती पाहता शहरी भागात कोणत्याही प्रकारची सरकारी बस सुविधा नाही.
हा सार्वजनिक कार्यक्रम MH_13_Solapurbe (सोशल मीडिया पार्टनर), MY FM (रेडिओ पार्टनर) आणि डी ए वी वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सोलापूरचे समन्वयक संघपाल शिंदे म्हणाले, “शहरात माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना त्यांच्या संस्थेत जाण्यासाठी बसेसची नितांत गरज आहे. कार्यक्षम आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक ही लोकांची मागणी आहे हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला.”
लोकांद्वारे भरलेली सुमारे ३०० मागणी पत्रे कार्यक्रमानंतर महानगरपालिका आयुक्त यांच्यासमोर मांडण्यात आली. महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत श्री. पी. शिवशंकर यांनी सोलापूरमधील बससेवा कार्यक्षम करण्यासाठी प्रशासन तसेच आर्थिक बाबींचा विचार करण्याचे आश्वासन दिले. सोलापूर परिवहन समितीच्या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठी एसएमसीसोबत काम करण्यास आयुक्तांनी परीसरला सांगितले आहे, जे शहरात बससेवा सुरू करण्याच्या परिचालन, व्यवस्थापकीय आणि धोरणात्मक बाबी मांडतील.
वान्यालोलू आय.एम., परिवहन व्यवस्थापक, एसएमटीयू (सोलापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) यांनी बस-आधारित सार्वजनिक वाहतुकीचे सामाजिक आणि पर्यावरणीय फायद्यांचे वर्णन केले. “बस हि खऱ्या अर्थाने नागरिकांना सेवा देण्यासाठी आहे. राज्याने महामंडळांना आर्थिक सहाय्य करणे आणि शहर बसेसवर आकारले जाणारे कर काढून टाकणे महत्वाचे आहे”, श्री वान्यालोलू यांनी जोडले.
तर बस परिवहनात सुधार करायचा असेल तर आपल्याला अजुन काय करता येईल या बद्दल रणजीत गाडगीळ यांनी असे मत मांडले की, “३०० बस पीपीपी – पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप – तत्त्वावर चालवण्यासाठी वार्षिक अंदाजे २६ कोटी निधी लागेल. यात २५% वाटा शहराचा आणि ७५% वाटा राज्यसरकारचा असावा असं करता येईल. ६.५ कोटी ही रक्कम सोलापूर महानगरपालिकेला नक्कीच परवडण्याजोगी आहे. फ्लायओव्हर किव्वा रस्तारुंदीकरण यापेक्षा कितीतरी पट खर्चिक असतात.”
चांगली बस सेवा पुरवण्यासाठी त्याचे नियोजन शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजे आणि पीपीपी तत्त्वावर बस सेवा चालवण्यासाठी योग्य अशी यंत्रणा उभी केली पाहिजे ज्यासाठी राज्यशासनाने तांत्रिक सल्लागार पुरवले पाहिजेत असे ही या मोहिमेचे उद्देश्य आहे.
Press coverage: